07 September, 2023

 

मराठवाडा सहकारी साखर कारखाना कर्मचाऱ्यांनी उर्वरित देय रक्कम मिळण्यासाठी

आवश्यक कागदपत्राची पूर्तता करण्याचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 07 :  कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील मराठवाडा सहकारी साखर कारखाना अवसायनापूर्वी सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे अंतिम देय रक्कमेपैकी 53 टक्के रक्कम यापूर्वी सन 2008 मध्ये वाटप करण्यात आले आहे. उर्वरित 47 टक्के देय रकम मिळण्यासाठी कर्मचारी कामगार बचाव कृती समितींनी रिट याचिका क्र. 5690/2004 मध्ये दिवाणी अर्ज क्र. 2464/2023 मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी निकाली काढून कर्मचाऱ्यांची उर्वरित 47 टक्के देय रक्कम देण्याचे आदेश पारित केले आहेत.

साखर कारखाना कर्मचाऱ्यांचा बऱ्याच दिवसाचा चालू असलेला लढा या निर्णयामुळे निकाली निघाला आहे. जिल्हाधिकारी तथा मराठवाडा सहकारी साखर कारखान्याचे अवसायक जितेंद्र पापळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्यामुळे कारखाना कामगारांचा प्रदीर्घ काळापासून चाललेला न्यायालयीन लढा संपुष्टात आला आहे.

कर्मचाऱ्यांची उर्वरित देय रक्कम मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी अवसायन विभाग, मराठवाडा सहकारी साखर कारखाना डोंगरकडा (अवसायनात) जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे येऊन पूर्तता करावेत, असे आवाहन अवसायक, मराठवाडा सहकारी साखर कारखाना तथा जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

                                                            *****

 

No comments: