07 September, 2023

 

जिल्हाधिकारी कार्यालयात राजे उमाजी नाईक यांना अभिवादन

 


हिंगोली (जिमाका), दि. 07 :  राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवासी  उपजिल्हाधिकारी  दिलीप कच्छवे  यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, जिल्हा नियोजन अधिकारी सुशिल आग्रेकर, तहसीलदार सर्वश्री. नवनाथ वगवाड, विठ्ठल परळीकर, नायब तहसीलदार डी. एस. जोशी यांच्यासह‍ प्रशासकीय इमारतीमधील सर्व विभागप्रमुख व कर्मचारी यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

                                                            *****

No comments: