19 September, 2023

 

हिंगोली जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये दि. 17 सप्टेंबर, 2023 रोजी

मेरा मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत अमृत कलश यात्रेचे आयोजन

                                                                         





            

            हिंगोली (जिमाका), दि. 19 : हिंगोली जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये दि. 17 सप्टेंबर, 2023 रोजी मेरा मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये 563 पैकी 414 ग्रामपंचायतींनी सक्रीय सहभाग नोंदविला आहे. उर्वरित ग्रामपंचायतीमध्येसुद्धा अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधीर ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत, ग्रामसेवक, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, विद्यार्थी, युवक गावागावातील भजनी मंडळ यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून उपक्रम यशस्वीपणे राबविला आहे.

******

No comments: