14 September, 2023

 मराठवाडा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त

हिंगोली नगर परिषद मार्फत देशभक्तीपर रांगोळी स्पर्धेचे आयोजन

 



            हिंगोली (जिमाका), दि. 14 :  मराठवाडामुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तसेच माझी वसुंधरा अभियान 4.0,स्वछ सर्वेक्षण 2024 अभियानाची प्रभावी अंमलबजावणी संपूर्ण हिंगोली शहरात सुरु आहेत्याअनुषंगाने हिंगोली नगर परिषदमार्फत हिंगोली नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अरविंद मुंढे  यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहेयाचाच एक भाग म्हणून हिंगोली शहरातील 15 वर्ष ते 60 वर्षापर्यंत असलेल्या महिलांकरिता देशभक्तीपर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

ही रांगोळी स्पर्धा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन  75 वा अमृत महोत्सव वर्ष विषयांवर आयोजित करण्यात आली होती  यामध्ये प्रथम पारितोषिक 5 हजार रुपये  प्रमाणपत्रद्वितीय पारितोषिक 3 हजार रुपये  प्रमाणपत्र आणि तृतीय पारितोषिक 2 हजार रुपये  प्रमाणपत्र तसेच प्रत्येक सह्भागीस प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

यामध्ये एकूण 16 स्पर्धकांनी भाग घेत अतिशय सुंदर अशा रांगोळी काढल्या  मराठवाडा मुक्ती संग्राम बाबत संदेश देऊन घोषवाक्य लिहिण्यात आलेया काढण्यात आलेल्या रांगोळीचे परीक्षण करण्यासाठी सौविद्या पवारअॅडजया करडेकरसौशिल्पा नरसिकर यांची परीक्षक म्हणून नगर पालिकेमार्फत नियुक्ती करण्यात आली होतीया स्पर्धेचा निकाल हा येत्या 17 सप्टेंबरला नगर परिषद कार्यलयात जाहीर करण्यात येणार असून बक्षीस वितरण समारोह आयोजित करण्यात येणार आहे.  या कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडेप्रशासकीय अधिकारी श्याम माळवटकरकार्यालयीन अधीक्षक देवीसिंग ठाकूरस्वच्छता निरीक्षक बाळु बांगरअनिकेत नाईकरमाकांत बाच्छेवसंत पुतळेराजेश पदमनेलक्ष्मीकांत देशमुख

...

No comments: