13 September, 2023

 

औंढा नागनाथ तालुक्यातील सर्वसाधारण प्रवर्गातील युवक व युवतीसाठी

अगरबत्ती व मोमबत्ती तयार करण्यासाठी मोफत प्रशिक्षणाचे आयोजन

19 सप्टेंबर पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 13  :  येथील जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने औंढा नागनाथ तालुक्यातील सर्वसाधारण (Open) प्रवर्गातील युवक, युवतीसाठी अगरबत्ती व मोमबत्ती तयार करण्यासाठी मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यासाठी उमेदवार हा किमान 07 वी पास असावा, वय 18 ते 45 वर्षे यादरम्यान असावे. तसेच जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, टीसी, गुणपत्रक, बँक पासबूक जमा करुन आपली नाव नोंदणी दि. 19 सप्टेंबर, 2023 पर्यंत करावेत. नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी किसन धाबे (मो.9370631461), कार्यक्रम आयोजक महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, एस-12, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस. के. कादरी व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले यांनी केले आहे.    

***** 


No comments: