12 September, 2023

 

शालेय विद्यार्थ्यांना महामानवांच्या ग्रंथाचे वितरण

 


हिंगोली (जिमाका), दि. 12 : नशा मुक्त भारत अभियानांतर्गत विद्यार्थी विद्यार्थिनींना महामानवांचे पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आले. तसेच नशा मुक्त भारत अभियान समितीच्या अंतर्गत जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग आणि नशाबंदी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भावी पिढीला व्यसनमुक्तीच्या प्रसारार्थ राष्ट्रपुरुष आणि महामानवांचे विचार रुजवण्यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना महामानवांचे पुस्तके उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अग्रणी स्वातंत्र्यसेनानी गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या जन्मशताब्दी निमित्त येथील सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात  शालेय व कनिष्ठ महाविद्यालयातील 282 उमेदवारांना प्रबोधनात्मक ग्रंथ उपलब्ध करुन देण्यात आले.  

या प्रसंगी प्राचार्य सी. के. देशपांडे, नशा मुक्त भारत अभियान समितीचे जिल्हा समन्वयक विशाल अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रबोधनात्मक उपक्रमाचे नशा मुक्त भारत अभियान समितीचे सचिव तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर. एच. एडके यांनी कौतूक केले. नशाबंदी मंडळाचे कार्यकर्ते श्रीकृष्ण चौंडेकर, राहुल येरमाळ, आदित्य सानप आदींनी परिश्रम घेतले.

******

No comments: