18 September, 2023

 

कळमनुरी आयटीआय मध्ये पीएम स्कील रन मॅरेथॉन व पदवीदान सोहळा संपन्न

 



हिंगोली (जिमाका), दि. 18 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळमनुरी अंतर्गत दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनासोबतच भगवान विश्वकर्मा जयंती निमित्त व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पीएम स्कील रन या 5 कि.मी. मॅरेथॉनला भारतीय स्टेट बँक शाखा कळमनुरीचे मॅनेजर प्रवीण ठाकरे व त्यांचे असिस्टंट मॅनेजर श्री. सोळंके व श्री. केदार यांच्यातर्फे हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली. या मॅरेथॉन मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या विजेत्यांना अनुक्रमे तीन हजार, दोन हजार, एक हजार  असे पारितोषिक व प्रशस्तीपत्र देण्यात आले.

तसेच संस्थेमध्ये सन 2023 मध्ये संस्थेतून विविध ट्रेड मधून पास आऊट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पदवीदान समारंभाचे आयोजन करुन संस्थेतून सर्व ट्रेड मधून प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारतीय स्टेट बँक शाखा कळमनुरीचे व्यवस्थापक श्री. प्रवीण ठाकरे व त्यांचे सहायक व्यवस्थापक श्री. सोळंके व श्री. केदार यांच्या हस्ते  प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.जी.सोनटक्के यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेतील निदेशक श्री.आर.एम.सोनटक्के, कु.हुलसुरे, मुख्य लिपिक श्री.देशमुख, वरिष्ठ लिपिक कु.सोरगे, कनिष्ठ लिपिक श्री. गायकवाड , सहाय्यक भांडारपाल श्री. सूर्यवंशी, श्री. इरफान, श्री. गायकवाड, श्री. साखरवाड, श्री. शेरु तसेच मेस्को कर्मचारी श्री. लुटे, श्री. शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.

*****

No comments: