15 September, 2023

 

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त हिंगोली येथे कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन

 



 

हिंगोली (जिमाका), दि. 15 : मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रमानी साजरा करण्याचे शासनाने निर्देश दिले आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली व हिंगोली जिल्हा कुस्तीगीर परिषद, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव-2023 च्या अनुषंगाने दि. 13 सप्टेंबर, 2023 रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे हिंगोली जिल्हा मर्यादीत पुरुष व महिला गटा फ्री स्टाईल या प्रकारात कुस्ती स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये शहर व ग्रामीण भागातील कार्यरत असलेले कुस्ती आखाडा केंद्र, शालेय व महाविद्यालयीन खेळाडू असे जवळपास 100 मल्ल विविध वजन गटात सहभाग घेतले.

या स्पर्धेचे उद्घाटन प्रसिध्द पहेलवान गणेश लुंगे यांचे हस्ते झाले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन शिव छत्रपती पुरस्कारार्थी प्रा डॉ. बंकट, एनआयएस प्रशिक्षक जम्मु भैया यादव, जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी शिवाजी इंगोले, इतर मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धा विविध वजन गटात खेळवून प्राविण्य खेळाडूचे निकाल पुढील प्रमाणे आहे. 35 किलो खालील वजन गटात प्रथम ऋषिकेश पंडीत, व्दितीय लक्ष्मण शिंदे, तृतीय उमेश यादव यांनी मिळवला आहे. 50 किलो खालील वजन गटात प्रथम परमेश्वर काळे, व्दितीय शिवाजी शिंदे, तृतीय अनिल पोले.  55 किलो खालील वजन गटात प्रथम दिपक नवघरे, व्दितीय दिव्यांश चौधरी, तृतीय गोपाल दुबकलु , 60 किलो खालील वजन गटात प्रथम परीक्षीत मगर, व्दितीय संतोष राहुरी, तृतीय अविनाश पाईकराव, 65 किलो खालील वजन गटात प्रथम गजानन चव्हाण, व्दितीय आदित्य रहाटे, तृतीय कार्तीक मंडलीक, 70 किलो खालील वजन गटात प्रथम अविनाश जाधव, व्दितीय भगवान मुटकुळे, तृतीय अमोल मुळे, 75 किलो खालील वजन गटात प्रथम विजय चव्हाण, व्दितीय पांडुरंग सूर्यवंशी, तृतीय विशाल गरड,  80 किलो खालील वजन गटात प्रथम लक्ष्मण घुगे, व्दितीय विष्णु रहाटे, तृतीय ओमकार लिंबाळे, 85 किलो खालील वजन गटात प्रथम वाल्मिक डाखोरे, व्दितीय लक्ष्मीकांत जैयस्वाल, तृतीय समीर शेख, 90 किलो खालील वजन गटात प्रथम डिगाबंर भुतनर, व्दितीय स्वप्नील साळवे, तृतीय दुर्गेश लुंगे, 90 किलो वरील वजन गटात प्रथम प्रदीप माघाडे, व्दितीय सुनिल गडदे, तृतीय सखाराम मारकड तर महिलांमध्ये 45 किलो खालील वजन गटात प्रथम रुपाली शिंदे, व्दितीय राजनंदिनी पाईकराव, तृतीय साक्षी काटकर यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे. प्राविण्य प्राप्त खेळाडुना रोख रक्कम व ट्रॉफी प्रदान करण्यात आले आहे. या स्पर्धेत गुणलेखक, पंच, वेळाधिकारी म्हणुन भालचंद्र रणशुर. प्रा. संदीप लोंढे, बालाजी नरोटे, गजानन पवार, नफीस शेख, ऋषिकेश लुंगे, श्रीकृष्णा लुंगे यांनी काम पाहिले. कुस्ती स्पर्धा यशस्वी होण्यासाठी क्रीडाधिकारी आत्माराम बोथीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वसिम शेख, किसन पवार, अर्जुन पवार, शेख शहारुख यांनी परिश्रम घेतले.

******

No comments: