13 September, 2023

 

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त शासकीय जिल्हा ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शन

प्राचार्य डॉ. जयवंत एस. भोयर  यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

 



हिंगोली, (जिमाका) दि. 13  :  मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त येथील जिल्हा ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन आज कै. बाबुरावजी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत एस. भोयर  यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

            या ग्रंथप्रदर्शनात विशेषत: मराठवाडा मुक्तिसंग्रामाशी संबंधित माहिती नवीन पिढीला व जनतेला ग्रंथाच्या माध्यमातून व्हावी यासाठी मराठवाडा मुक्तिसंग्रामाशी संबंधित ग्रंथाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले होते. तसेच उपस्थित सर्वांनी काही वेळ ग्रंथवाचन करुन मराठवाडा मुक्तिसंग्रामाशी संबंधित माहिती करुन घेतली.

या वेळी जेष्ठ साहित्यिक अशोक अर्धापुरकर, कलानंद जाधव, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, प्रा.माणिक डोखळे, गजानन शिंदे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, मिलिंद सोनकांबळे, शंभूनाथ दुभळकर, ग्रंथालय पदाधिकारी व विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त  दि. 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर, 2023 (वाचन प्रेरणा दिन) पर्यंत विशेष वाचक सभासद नोदंणी मोहीम सुरु करण्यात येत आहे. हिंगोली जिल्हयातील सर्व ग्रंथप्रेमी, वाचकांनी मोठ्या प्रमाणात सभासद होऊन सहभाग नोंदवावा व वाचनाचा आनंद घ्यावा. यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरु नगर, रिसाला नाका, हिंगोली (सपंर्क क्र. 9403067267)  येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.       

हे ग्रंथ प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरु नगर, रिसाला नाका, हिंगोली येथे येऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.

******

No comments: