15 September, 2023

 

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त

आयोजित मॅरेथॉनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

  • मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांचे स्मरण ठेवावे- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 




हिंगोली, (जिमाका) दि. 15  :  मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावरुन मॅरेथॉनला सुरुवात झाली.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, छत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. बंकट यादव, हिंगोली जिल्हा ॲथलेटीक्स संघटनेचे सचिव रमेश गंगावणे, क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर उपस्थित होते .

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामात अनेकांचे महत्वपूर्ण योगदान आहे. या मुक्तिसंग्रामाच्या जाज्वल्य इतिहासाचा आपल्याला अभिमान आहे. हा इतिहास पुढील पिढीला सांगणे आवश्यक आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांचे स्मरण ठेवून त्यांच्या कार्याची जाणीव प्रत्यकाने ठेवावी, असे सांगून सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

ही मॅरेथॉन स्पर्धा पुरुष गटासाठी 5 कि.मी. धावणे व महिला गटासाठी 3 कि.मी. धावणे अशी आहे. पुरुष गटाची 5 कि.मी. धावण्याची मॅरेथॉन स्पर्धा जिल्हा परिषद कन्या शाळा येथून सुरुवात होऊन पिपल्स बँक-जुनी नगर परिषद-खुराणा पेट्रोलपंप-जवाहर रोड-इंदिरा चौक-अग्रसेन चौक-जिल्हाधिकारी कार्यालय-नगर परिषद नवीन इमारत-बिरसा मुंडा चौक-जिल्हा परिषद कन्या प्रशाला असा समारोप करण्यात आला. तर महिला गटाची तीन कि.मी. धावण्याची मॅरेथॉन स्पर्धा जिल्हा परिषद कन्या शाळा येथून सुरुवात होऊन पिपल्स बँक-जुनी नगर परिषद-खुराणा पेट्रोलपंप-जवाहर रोड-इंदिरा चौक-अग्रसेन चौक-एमजीपी पाण्याची टाकी-जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे समारोप करण्यात आला.

अंकिता गव्हाणे आणि छगन बोंबले मॅरेथॉनचे विजेते

जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित  मॅरेथॉन स्पर्धेमध्ये महिला गटात अंकिता गव्हाणे आणि पुरुष गटात छगन बोंबले यांनी विजेतपद पटकाविले. तसेच पुरुष गटात शुभम शिंदे द्वितीय, वैभव गुठ्ठे तृतीय, आतिष चव्हाण चौथा, शिवाजी शिंदे पाचवा, ओम जगताप सहावा, दिप खरात सातवा, ऋषीकेश मोरे आठवा, रुपेश राठोड नववा आणि भागवत जगताप यांचा दहावा क्रमांक आला आहे. तर महिला गटात प्रियंका पाईकराव द्वितीय, पायल राठोड तृतीय, पूजा सोनटक्के चौथी, विद्या खोकले पाचवी, काजल राठोड सहावी, पल्लवी गुव्हाडे सातवी, संतोषी बंदुके आठवी, ममता थोरात नववी आणि पूजा जगताप दहावी आलेली आहे. या सर्व विजेत्यांना मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर मंत्रीमहोदयांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण होणार आहे.

या मॅरेथॉनमध्ये हिंगोलीतील युवक, खेळाडूंसह विद्यार्थी, महिला, शासकीय अधिकारी व कर्मचारी यावेळी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

*****

No comments: