09 December, 2024
जिल्हा निर्यात केंद्राला प्रोत्साहन देण्यासाठी 17 डिसेंबर रोजी एकदिवशीय कार्यशाळा
हिंगोली (जिमाका), दि. 09 : राज्यामध्ये निर्यात क्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच रोजगार निर्मितीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि निर्यात वाढीला प्रत्येक जिल्ह्याला उत्तरदायी बनवण्यासाठी राज्याकडून केंद्र शासनाच्या 'जिल्हा हे निर्यात केंद्र' उपक्रमाला प्रोत्साहन देण्यात येत आहे.
निर्यात प्रचालन कार्यशाळा या प्रमुख मुद्याचा अंतर्भाव असलेली एक दिवशीय जिल्हास्तरीय कार्यशाळा दि. 17 डिसेंबर, 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत येथील जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेसाठी सूक्ष्म, लघु, मध्यम उपक्रम घटक, निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच सबंधित उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यातीसंबंधी कामकाज करणारे घटक तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात येणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सर्व उद्योग घटकांनी कार्यशाळेस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी केले आहे.
***
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment