19 December, 2024

महावितरण कार्यालयात नागरिकाची सनदचे वाचन

हिंगोली, दि. 19 (जिमाका) : ग्राहकांना स्पर्धात्मक किंमती विश्वसनीय आणि दर्जेदार सेवा देऊन भारतातील सर्वोत्तम विज वितरण उपयुक्त बनने आणि राज्याच्या आणि राष्ट्राच्या शाश्वत विकासात योगदान करण्यासाठी महावितरण कंपनीच्या हिंगोली मंडळ कार्यालयात नागरिकाची सनद कार्यक्रम आयोजित केला होता. सुशासन सप्ताहानिमित्त प्रशासन गॉव की ओर या उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अधीक्षक अभियंता राजेशसिंग माधोसिंग चव्हाण यांनी नागरिकाची सनद अधिकारी व कर्मचारी यांना वाचून उपस्थितांना शपथ देण्यात आली. यावेळी मंडळ कार्यालयातील कार्यकारी अभियंता सुरेंद्र मुंगारे, कार्यकारी अभियंता अमोल मोरे, व्यवस्थापक (विवले) रमेशकुमार सोनवणे, प्रभारी व्यवस्थापक (मासं) देविदास लांडगे, उपकार्यकारी अभियंता अतुल पेटकर तसेच आदी कर्मचारी उपस्थित होते. ******

No comments: