06 December, 2024
जिल्हास्तरीय युवा महोत्सवाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद • विजेत्या स्पर्धकांचा रोख पारितोषिक, ट्राफी व प्रमाणपत्र देऊन गौरव
हिंगोली (जिमाका), दि. 06 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नेहरु युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने येथील कै.शिवाजीराव देशमुख सभागृहात दि. 5 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांच्या हस्ते दीप प्रज्लवन करुन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दलित मित्र व युवा पुरस्कार विजेते डॉ.विजयकुमार निलावार हे होते.
यावेळी शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते प्रा. बंकट यादव, जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, गणेश बोडखे व राज्य क्रीडा मार्गदर्शक निळकंठ श्रावण उपस्थित होते.
उद्घाटनपर भाषणात श्री. एडके म्हणाले, जिद्द, मेहनत आणि इच्छा असेल तर जीवनात यशस्वी होता येते. त्यामुळे युवकांना कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले असून याद्वारे आपल्यामध्ये असलेल्या कलांचे सादरीकरण करुन जतन यशस्वी व्हावे, अशा शुभेच्छा दिल्या.
क्रीडा विभाग व नेहरु युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या प्रमाणात स्पर्धा भरवण्याचा प्रयत्न जिल्ह्यात करण्यात येत आहे. या माध्यमातून युवकांना कला सादर करण्याची संधी मिळाली असून जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घेऊन या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ. विजय निलावार यांनी केले.
प्रास्ताविकात नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांनी युवकांचा सर्वांगीण विकास व्हावा, संस्कृती व परंपरा जत करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देणे, त्यांना एक खुले व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दिली.
जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये युवकांसाठी लोकनृत्य, लोकगीत, कथालेखन, वक्तृत्व, चित्रकला, फोटोग्राफी, कथा लेखन, युथ आयकॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत हिंगोली जिल्ह्यातील युवक व युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजयी स्पर्धकांना रोख पारितोषिके व ट्राफी व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रेही वितरीत करण्यात आली.
वक्तृत्व स्पर्धेत पुष्यमित्र केशव जोशी (प्रथम), चित्रकला स्पर्धेत संजय बाळकृष्ण भराडे (प्रथम), कथा लेखन कु. प्रतिक्षा श्याम गायकवाड (प्रथम), कविता स्पर्धेत पुजा केशव गाढवे (प्रथम), विज्ञान व तंत्रज्ञान मधील नवसंकल्पनामध्ये पुष्यमित्र केशव जोशी (प्रथम), अनिल अरविंद चित्तेवार (व्दितीय), प्रेमकुमारसेन भगत (तृतीय), लोकगीत स्पर्धेत ज्युनिअर कालेज ऑफ एन्ट्रन्स ऑफ सायन्स अन्ड आर्ट्स हिंगोली (प्रथम), समूह लोकनृत्य स्पर्धेत ज्युनिअर कालेज ऑफ एन्ट्रन्स ऑफ सायन्स अन्ड आर्ट्स हिंगोली (प्रथम) क्रमांक पटकावले.
या जिल्हास्तरीय युवा महोत्सवासाठी पंच म्हणून प्रा. डॉ. पवन वासनिक, प्रा. आनंद गायकवाड, प्रा. लक्ष्मीनारायण सामलेटी, प्रा. सुरेश वराड, प्रा. धनंजय कुलकर्णी, प्रा. सुधीर वाघ, प्रा. सतीश वाढवे, प्रा. एस. के. वाघमारे, प्रा. एस. जी. वाघ, प्रा. शिवराज तरकसे, प्रा.धाराशिव शिराळे, प्रा.विद्या पवार, प्रा.सिमा शेळके, प्रशिक्षक राजु लोखंडे, प्रशिक्षक सुरज काशिदे, प्रा.शेगुळकर, प्रा. राम तोडकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच एकता युवा स्पोर्ट्स फाउंडेशन हिंगोलीचे सचिव तसेच मैदानी प्रशिक्षक गजानन आडे यांनी परिश्रम घेतले.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment