04 December, 2024

आंतरराष्ट्रीय दत्तक महिनानिमित्त हिवरा येथे जनजागृती

हिंगोली (जिमाका), दि. 04 : जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय दत्तक महिना निमित्ताने औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा येथील जिल्हा परिषद शाळेत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय दत्तक महिना निमित्ताने जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्पलाईन 1098 कडून बालकासंदर्भात आणि बालकांशी निगडीत विविध विषयावर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. कोणतेही बालक परस्पर दत्तक घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. यासाठी कायदेशीर प्रक्रिया www.cara.wcd.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन इच्छूक पालक बालकाला दत्तक घेऊ शकतात, अशी माहिती चाईल्ड हेल्पलाईन (CHL) 1098 हिंगोलीचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे यांनी बालकाचे कायद्याविषयी तसेच दत्तक प्रक्रियेसंदर्भात माहिती दिली. बालकांसाठी चाईल्ड हेल्पलाईन 1098 व बालहक्क सप्ताहाबाबतची माहिती समुपदेशक अंकुर पाटोडे यांनी दिली. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सामाजिक कार्यकर्ता रेशमा पठाण यांनी केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, सहशिक्षक व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. *******

No comments: