27 December, 2024

अवैध गौण खनिजाच्या उत्खनन व वाहतुकीशी संबंधित अपप्रवृतीवर सक्तीने नियंत्रण ठेवा-जिल्हाधिकारी

* जनतेनी अवैध मार्गाने गौण खनिज खरेदी करु नये हिंगोली (जिमाका),दि.२७ : गौण खनिजाशी संबंधी प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सर्व संबंधित विभागांचा परिणामकारक समन्वय साधण्यासाठी आणि अनधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुकीशी संबंधित अपप्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली दि. २६ डिसेंबर, २०२४ रोजी महसूल, पोलीस व परिवहन विभागातील अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी अवैध गौण खनिजाच्या उत्खनन व वाहतुकीशी संबंधित अपप्रवृतीवर सक्तीने नियंत्रण व परिणामकारक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या . तसेच जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून काम करण्याचे निर्देश दिले. त्याअनुषंगाने जनतेने अवैध मार्गाने कोणत्याही प्रकारचे गौण खनिज खरेदी करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे. ******

No comments: