12 December, 2024
शिक्षक पात्रता परीक्षेची तात्पुरती उत्तरसूची प्रसिध्द • प्रश्न किंवा पर्यायी उत्तराबाबत ऑनलाईनरित्या आक्षेप नोंदवावेत
हिंगोली (जिमाका), 12 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार, दि. 10 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र. 1 व 2 ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची प्रसिध्द करण्यात आली आहे.
या परीक्षेसाठी दोन्ही पेपर प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी, आक्षेप असल्यास ते परिषदेकडे दि. 16 डिसेंबरपर्यंत पाठवता येतील. याबाबत आक्षेप, त्रुटी बाबतचे निवेदन http://mahatet.in या संकेतस्थळावर परीक्षार्थ्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करुन दिलेल्या आक्षेप नोंदणी या लिंकद्वारे परिषदेकडे पाठवता येतील. आक्षेपाबाबत लेखी निवेदन समक्ष, टपालाने किंवा ई-मेलद्वारे पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही.
विहित मुदतीत ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करुन विषय तज्ज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तरसूची यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment