12 December, 2024

कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे-पाटील यांनी दिली दाटेगाव शाळेला भेट

• शाळेतील टेलीस्कोप यंत्र व वाचनालय उपक्रमाचे केले कौतुक हिंगोली (जिमाका), दि. 12 : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे-पाटील यांनी आज हिंगोली तालुक्यातील दाटेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन तेथे राबविण्यात येणाऱ्या टेलीस्कोप यंत्र व वाचनालय उपक्रमाची पाहणी करुन कौतुक केले. याप्रसंगी सन 2023 मध्ये हिंगोली जिल्ह्यातील विज्ञानाची आवड असलेले 35 विद्यार्थ्यांची सहल श्रीहरीकोट्टा येथे नेण्यात आली होती. तेथून प्रक्षेपण होणारे रॉकेट पाहणे साध्य झाले होते. या विद्यार्थ्यापैंकी एक असलेले उजैर मोहम्मद जागीरदार यांच्याशी व शाळेतील विद्यार्थ्यांशी ॲड. हेलोंडे-पाटील यांनी संवाद साधला. तसेच त्यांनी आपला देश समृध्द होण्यासाठी पहिले आपले गाव समृध्द झाले पाहिजे. यासाठी गावातील जिल्हा परिषद शाळा, शेतकरी समृध्द होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे,असे सांगितले. तसेच त्यांनी शाळेमध्ये असलेल्या टेलीस्कोपद्वारे चंद्र पाहण्याचा आनंद घेतला. तसेच त्यांनी तेथे असलेल्या ग्रंथालयाला भेट देऊन उपलब्ध असलेल्या स्पर्धा परीक्षा पुस्तकांची पाहणी करुन समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, शिक्षणाधिकारी (माध्य) प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी (प्राथ) संदीपकुमार सोनटक्के, हिंगोलीचे गटविकास अधिकारी डी. आय. गायकवाड, कळमनुरीचे गटविकास अधिकारी प्रदीप बोंढारे, शाळेतील शिक्षक देवानंद येल्लारे, संजय जाधव, संजय डुकरे, विज्ञान समन्वयक बालाजी काळे, तांत्रिक शिक्षक विजय बांगर उपस्थित होते. *******

No comments: