19 December, 2024

प्रशासन गांव की ओर सप्ताहांतर्गत कृषि विभागातर्फे चर्चासत्र व कार्यशाळा

हिंगोली, (जिमाका) दि. 19 : सुशासन सप्ताहांतर्गत प्रशासन गांव की ओर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कृषि विभागातर्फे हिंगोली तालुक्यात यानिमित्त बुधवार (दि.18) रोजी मासिक चर्चासत्र व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या मासिक चर्चासत्रात मौजे डिग्रस क., दाटेगाव, सवड, देऊळगाव रा. , राहोली बु. आदी गावांना जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम, उपविभागीय कृषि अधिकारी प्रदीप कच्छवे, तालुका कृषि अधिकारी गोविंद काळे, सुनिल भिसे, कुंभार, मंडळ कृषि अधिकारी कमलाकर सांगळे, बालाजी गाडगे, अनंत मुळे, लिंबाळकर, नितीन घुगे, अमित सोळंके, मनोज लोखंडे, संघई, मराठवाडा कृषि विभागाचे शास्त्रज्ञ गजानन गडदे, मधुकर मांडगे, तोंडापूर कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ राजेश भालेराव, अनिल कोळंबे, तंत्र अधिकारी अनिता राहणे यांनी भेट देऊन हरभरा, तूर, करडई या रब्बी हंगामातील पारंपारिक पिकास मल्चींगवरील टरबूज व खरबूज पिकांची तसेच फळधारणा झालेल्या संत्रा फळबागांची पाहणी करुन उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच राहोली बु. येथील प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेंतर्गत अनुसया राऊत यांनी स्थापन केलेल्या स्वानंद लाकडी तेलघाना उद्योगास भेट देण्यात आली. क्षेत्रीय भेटीनंतर हिंगोली तालुक्यातील देऊळगाव रामा येथे उपस्थित शास्त्रज्ञांनी सद्यस्थितीतील पिक परिस्थितीबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी पर्यवेक्षक अरुण पडघन, शंकर कोटे, कृषी सहाय्यक विलास गिरी, शुभांगी वाळुंज, दामोदर रोडगे यांनी विशेष प्रयत्न केले. ******

No comments: