03 December, 2024
बाल हक्क व आंतरराष्ट्रीय दत्तक महिनानिमित्त सेनगाव येथे जनजागृती
हिंगोली (जिमाका),दि.03 : जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाच्या वतीने सेनगाव येथील पोलीस स्टेशन, बसस्थानक, उपजिल्हा रुग्णालय या विविध ठिकाणी बाल हक्क व आंतरराष्ट्रीय दत्तक महिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले.
दत्तक महिना निमित्ताने उपस्थितांना दत्तक इच्छुक पालकास कायदेशीर दत्तक प्रक्रियेसंदर्भात माहिती देण्यात आली. यामध्ये दत्तक इच्छुक पालकांच्या www.cara.wed.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन कायदेशीररित्या बालकास दत्तक घेऊ शकतात, अशी माहिती देण्यात आली. तसेच फोस्टर केअर अँड फोस्टर केअर अडॉप्टेशन प्रक्रियेबाबत प्रतिपालकत्व स्वीकारु इच्छिणाऱ्या पालकांसाठी बालगृहातील काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांचे प्रतिपालकत्व स्वीकारणे तसेच जिल्ह्यात विधवा माता, कुमारी मातांना नको असलेल्या नवजात बाळाचे सुखरुप समर्पण करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
अनाथ, सोडून दिलेले व परित्याग केलेले बालक इत्यादी संदर्भात माहिती मिळाल्यास तात्काळ जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय हिंगोली किंवा चाईल्ड हेल्प लाईन (1098) यांना संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण कक्ष कार्यालयाकडून करण्यात आले. तसेच त्याठिकाणी पोस्टर्स, जाहीर आवाहन व संपर्क क्रमांकासह भिंती पत्रके लावण्यात आले.
ग्राम स्तरावर बालकांच्या हक्काचे संरक्षण करणारी ग्राम बाल संरक्षण समिती गठीत करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सेनगाव तालुक्यातील मौजे ब्राम्हणवाडा येथे ग्राम बाल संरक्षण समितीची बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी संस्थात्मक गणेश मोरे, सामाजिक कार्यकर्ता रेशमा पठाण, चाईल्ड हेल्प लाईन (1098) चे पर्यवेक्षक विकास लोणकर, श्रीकांत वाघमारे व केस वर्कर राजरत्न पाईकराव इत्यादी उपस्थित होते.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment