20 December, 2024

परदेश शिष्यवृत्तीसाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत

हिंगोली (जिमाका), दि. 20 : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात पदव्युत्तर, पदवी व पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता अल्पसंख्याक समाजातील मुस्लीम, बौध्द, ख्रिश्चन, जैन, पारशी, ज्यू, शीख या प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी राज्य शासनाकडून शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यासाठी अल्पसंख्याक विभागाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. या योजनेसाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडीमध्ये विस्तृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. अल्पसंख्याक प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी दि. 31 डिसेंबर, 2024 पर्यंत आयुक्त, समाज कल्याण, 3 चर्च पथ रोड, महाराष्ट्र राज्य, पुणे-01 येथे अर्ज करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे. ******

No comments: