20 December, 2024

सुशासन सप्ताहानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम, शासनाच्या विविध योजनांची माहिती गावपातळीवर

हिंगोली (जिमाका), दि. 20 : जिल्ह्यात 24 डिसेंबरपर्यंत सुशासन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध लोकाभिमुख योजना 'प्रशासन गाव की ओर' उपक्रमात तहसील आणि पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायत पातळीवर पोहचविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने सर्व समाजातील विविध घटकातील नागरिकांच्या अडचणी, तक्रारी विशेष मोहीम, उपक्रमाचे शिबिरे आयोजित करून त्या दूर करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याअनुषंगाने सुशासन सप्ताहानिमित्त आज जिल्ह्यात विविध कार्यालयातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सुशासन सप्ताहानिमित्त आज सेनगाव तालुक्यातील गणेशपूर येथे हरभरा पिकांची शेतीशाळा, जोडतळा व खानापूर येथे कृषी विभागाच्या विविध योजनाविषयी मार्गदर्शन, वाघजळी येथे कृषी विभागाच्या भाऊसाहेब फुंडकर, महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड, गांडूळ खत, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, प्रधानमंत्री किसान योजना अशा विविध योजनांची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमास शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रमाणात प्रतिसाद मिळाला. यावेळी गणेशपूर येथे कृषी सहायक श्री. हरणे, गावातील सरपंच व इतर नागरिक उपस्थित होते. जोडतळा येथे कृषी पर्यवेक्षक श्री. राठोड, कृषी सहाय्यक बी. यु. इंगोले, विजय पवार, बी. एस. काळे, एस. एम. इंगळे व समस्त शेतकरी उपस्थित होते. खानापूर येथे मंडळ कृषी अधिकारी, सर्व कृषी सहायक तसेच पीएमएफएमई योजनेचे अधिकारी यांनी शेतकरी व महिला बचत गटांना मार्गदर्शन केले. वाघजळी कृषी सहायक उपस्थित होते. कळमनुरी तहसील कार्यालयात सुशासन सप्ताहानिमित्त आज पुरवठा विभागामार्फत अपंग, दिव्यांग यांना अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या. तसेच संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना या विभागामार्फत लाभार्थ्यांच्या अर्जाची तपासणी करण्यात आली. तसेच सर्व कर्मचारी यांनी नागरिकांची सनद याचे वाचन केले. कळमनुरी येथील उपविभागीय अधिकारी, प्र.तहसिलदार, नायब तहसीलदार (पुरवठा), नायब तहसीलदार (संगायो) उपस्थित होते. समाज कल्याण विभागाच्या वतीने समाज कल्याण मुलींचे वस्तीगृह येथे शासकीय योजनांची महिती देण्यात आली. तसेच जटाळवाडी व मसोड, जवळा बाजार येथे शेळ्यांची जंत निर्मूलन मोहिम राबविण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त डॉ.शिवाजी बुचाले, पशुधन विकास अधिकारी (विस्तार ) डॉ. आदित्य पारवेकर, पशुधन विकास अधिकारी डॉ. अंतिका पालिमकर उपस्थित होते. वसमत तालुक्यातील टाकळगाव ग्रामपंचायत कार्यालयात आज सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला व ग्रामस्थांना पर्यावरण संवर्धनाविषयी माहिती देण्यात आली. *******

No comments: