24 December, 2024

*जिल्हाधिकारी कार्यालयात ४९५ जणांची आरोग्य तपासणी* जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी घेतला शिबिराचा लाभ

हिंगोली, दि. 24 (जिमाका): केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाकडून देशभरात ‘देश का प्रकृती परीक्षण अभियाना’च्या पहिला टप्प्यात आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष‍ शिबिराच्या माध्यमातून जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्यासह 495 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य यंत्रणेने ही तपासणी केली असून, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि जिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने हे विशेष तपासणी शिबीर घेण्यात आले. ‘देश का प्रकृती परीक्षण अभियाना’चा पहिला टप्पा हा 25 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर 2024 दरम्यान राबविण्यात आला असून, या शिबिरात 495 अधिकारी-कर्मचारी व रुग्णालयातील रुग्णांच्या आरोग्याची तपासणी करून माहिती अॅपद्वारे नोंदविण्यात आली. जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ‘देश का प्रकृती परीक्षण अभियान’ राबविण्यात आले. या अभियानामध्ये आयुर्वेद वैद्यकीय अधिकारी (आयुष, आरबीएसके), आंतरवासीय वैद्यकीय अधिकारी, हिंगोली व आयुर्वेद महाविद्यालयातील प्राध्यापक आणि वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची आरोग्य तपासणी डॉ. विद्या देवकते, डॉ. सोनी अग्रवाल, डॉ. रक्षिता शिंदे, डॉ. पृथ्वी सातपुते, डॉ. पंकज ढाले, संतोष वानखेडे, गौरव पत्रे व रोहिणी साठे यांनी केली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गोपाल कदम व निवासी वैद्यकीय अधिकारी (बा.सं.) डॉ. शैलजा कुप्पास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील आयुष विभागातील डॉ. दीपक मोरे, डॉ. महेश पंचलिंगे, डॉ. संजय नळगीरे व कर्मचारी संतोष वानखेडे, सुनिल जाधव, श्रीमती रेखा टेकाळे यांनी परिश्रम घेतले. *****

No comments: