09 December, 2024

हिंगोली जिल्ह्यात हत्तीरोग सर्व्हेक्षण मोहिमेस प्रारंभ

हिंगोली (जिमाका), दि. 09 : हिंगोली हत्तीरोग बाधित नसलेल्या जिल्ह्यामध्ये समाविष्ठ आहे. जिल्ह्यात सार्वत्रिक औषधोपचार मोहीम सन 2025 मध्ये समाविष्ट करण्यात आल्यामुळे रिमॅपिंगकरिता रात्र रक्तनमुने संकलन सर्व्हेक्षणाकरिता प्रत्येक तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रातील ब्लॉक (फिक्स गांव, रॅन्डम गाव) निश्चित करण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यातील फिक्स गावे गाडीबोरी, वसमतचा शहरी भाग, डोंगरकडा येथे तर रॅन्डम गावे हत्ता, सुरेगाव, बाळापूर येथे आजपासून (दि.09) 14 डिसेंबरपर्यंत रात्री 8 ते 12 या वेळेत रात्र रक्तनमुने संकलन करण्यासाठी मोहीम सुरु करण्यात आली आहे. यामध्ये 20 वर्षावरील कोणत्याही व्यक्तीचे एलएफ (लिम्फॅटिक फायलेरीयासिससाठी) रात्र रक्तनमुने घेण्यात येणार आहेत. नमुन्यांची लगेच तपासणी करुन अहवाल सादर करण्यात येणार असून या मोहिमेमध्ये काही गावे निश्चित करण्यात आली आहेत. संबंधित गावांमध्ये नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना रात्र रक्तनमुने संकलन करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांनी केले आहे. *******

No comments: