01 December, 2025
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक -2025 मंगळवार 2 डिसेंबर रोजी मतदान मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सांय. 5.30 या मतदानासाठी प्रशासन सज्ज; मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क अवश्य बजवावा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली, (जिमाका) दि.01 : जिल्ह्यातील कळमनुरी नगर परिषद व हिंगोली नगर परिषदेतील प्रभाग क्र. 5 (ब) व 11 (ब) वगळून होणाऱ्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता मंगळवार 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. मतदारांना सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या कालावधीत मतदान करता येणार आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदारांनी निर्भयपणे आपल्या मतदानाचा अमूल्य हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी नगर परिषद व हिंगोली नगर परिषद (प्रभाग क्र. 5 (ब) आणि 11 (ब) वगळून नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मतदानाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद क्षेत्रात कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नगर परिषद निवडणुकीसाठी मतदाराला मतदार यादीतील आपले नाव शोधण्याकरिता https://mahasecvoterlist.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. संकेतस्थळावरील Search Name in Voter List यावर क्लिक करून नाव किंवा EPIC (मतदार ओळखपत्र) क्रमांक नमूद करून मतदार यादीतील आपले नाव शोधता येईल. निवडणुकीची मतमोजणी बुधवार 3 डिसेंबर, 2025 रोजी होणार आहे.
**
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment