24 December, 2025
महाज्योतीमार्फत जेईई, नीट, एमएचटी-सीईटी 2025-27 पूर्व प्रशिक्षण योजनेअंतर्गत 34 विद्यार्थ्यांना टॅब वाटप
हिंगोली (जिमाका), दि. 24 : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या जेईई, नीट, एमएचटी-सीईटी 2025-27 परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील निवड झालेल्या 34 विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक यादव गायकवाड यांच्यासह महाज्योती कार्यालयाकडून टॅब वाटपासाठी निवड झालेले विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर महाज्योतीमार्फत जेईई, नीट, एमएचटी-सीईटी 2025-27 परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड झालेल्या 34 विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना टॅबचा शैक्षणिक वापर कसा करावा, ऑनलाईन अध्ययन, अभ्यासक्रम व परीक्षेच्या तयारीसाठी टॅबचा प्रभावी उपयोग याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या कार्यालयातील सहायक लेखा अधिकारी किशोर महाजन, निरीक्षक मनिष राजुलवार, बालाजी टेंभुर्णे, वरिष्ठ लिपिक भास्कर वाकळे, ग्रंथपाल बाळु पवार, श्रीमती श्रध्दा तडकसे, जयदीप देशपांडे, प्रतिक सरनाईक, श्रीमती दिपाली सोनकांबळे, श्रीमती उखा मुरकुटे, श्रीमती विना कोकणी, प्रफुल चवरे, सचिन टाले, मारोती इंगळे, निरज राठोड, विश्वनाथ खोकले, संतोष गलांडे यांनी परिश्रम घेतले.
**
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment