04 December, 2025

वसमत नगरपरिषद निवडणुकीसाठी सुधारीत कार्यक्रम जाहीर

• उमेदवारांना 10 डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन मागे घेण्याची मुदत हिंगोली (जिमाका), दि. 4: राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपालिका आणि नगरपंचायती निवडणुकांसाठी कार्यक्रम घोषित केला असून त्यानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. राज्य आयोगाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी वसमत नगर परिषदेसाठीचा सुधारीत निवडणूक कार्यक्रम आज दि. 4 डिसेंबर 2025 रोजी जाहीर केला आहे. वसमत नगरपरिषदेच्या अध्यक्ष पदासाठी नामांकन दाखल केलेले सर्व उमेदवार तसेच प्रभाग क्र. 01 (अ), 4 (ब), 6 (ब), 8 (ब), 11 (ब), 13 (अ) आणि 14 (अ) या प्रभागांतील उमेदवारांचे नामनिर्देशन सुधारीत कार्यक्रमात समाविष्ट आहेत. अध्यक्ष पदाचे सर्व उमेदवार व वरील प्रभागांसाठीच्या सुधारीत नमुना सुचीनुसार उमेदवारांना त्यांचे नामनिर्देशन मागे घेण्यासाठी 10 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे, असे वसमतचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने यांनी कळविले आहे. ******

No comments: