10 December, 2025

जिल्हा रुग्णालयात मोफत त्वचारोग निदान व उपचार शिबीर

हिंगोली: दि. 10, (जिमाका): जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीतील निर्देशानुसार जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथे आज मोफत त्वचारोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात त्वचारोग तज्ञ डॉ. छाया कोल्हाळ यांनी 70 संशयित रुग्णांची तपासणी करुन 1 असांसर्गिक कुष्ठरुग्णाचे निदान केले व त्यांना त्वरित बहुविध औषधोपचार देण्यात आले. यावेळी सहायक संचालक आरोग्य सेवा ( कुष्ठरोग) डॉ. राहुल गिते, अभियान नोडल अधिकारी डॉ. सुनील देशमुख व कर्मचारी उपस्थित होते. उद्या गुरुवार दि. 11 डिसेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय वसमत व शुक्रवार, दि. 12 डिसेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी येथे मोफत त्वचारोग निदान व उपचार शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. तेव्हा नागरिकांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी केले आहे. ***

No comments: