22 December, 2025
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2025 पेपर क्र. 2 ची अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध
हिंगोली (जिमाका), दि. 22: शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टाईटी)-2025 चे आयोजन रविवार, दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आले होते.
या परीक्षेतील महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी)-2025 च्या पेपर क्रमांक 2 ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
परीक्षेसाठी पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 मधील प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तरांबाबत उमेदवारांना काही त्रुटी अथवा आक्षेप असल्यास, ते दिनांक 19 डिसेंबर 2025 ते 27 डिसेंबर 2025 या कालावधीत परिषदेकडे सादर करता येतील. संबंधित आक्षेपांचे निवेदन आवश्यक पुराव्यासह केवळ ऑनलाईन पद्धतीने https://mahatet.in या संकेतस्थळावर उमेदवारांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या “आक्षेप नोंदणी” या लिंकद्वारेच पाठवावे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे. ऑनलाईन पद्धतीखेरीज लेखी, टपालाने अथवा ई-मेलद्वारे पाठविलेल्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही.
विहित मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांचा विषयतज्ञांच्या अभिप्रायानुसार विचार करून अंतिम उत्तरसूची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येणार असून, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी केले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment