04 December, 2025
मिनी ट्रॅक्टरसाठी अर्ज करण्याचे बचत गटांना आवाहन
• सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागामार्फत अर्ज मागविणे सुरू
हिंगोली (जिमाका), दि. 04 : सामाजिक न्याय विभाग आणि विशेष सहाय्यक विभागांतर्गत सन 2025-26 साठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरविण्याच्या योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
यासाठी परिपूर्ण भरलेले अर्ज कार्यालयीन वेळेत सहायक आयुक्त समाज कल्याण, हिंगोली यांच्या कार्यालयात सादर करावेत. अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे:
बचत गटाचे शासकीय नोंदणी प्रमाणपत्र, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (जिवनोन्नती अभियान), जिल्हा परिषद हिंगोली यांच्याकडील ऑनलाइन नोंदणी प्रमाणपत्र व सर्व सदस्यांची यादी किंवा कृषी विभागातील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), हिंगोली यांच्याकडून मिळालेले ऑनलाइन नोंदणी प्रमाणपत्र. गटातील सदस्यसंख्या किमान 10 असणे बंधनकारक. गटातील 80 टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असावेत, तसेच सर्व सदस्यांचे जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक. गटाचे बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेत असणे आवश्यक, बचत गटाचा पॅनकार्ड क्रमांक अनिवार्य, महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. तसेच यापूर्वी बचत गटाने किंवा गटातील कोणत्याही सदस्याने या योजनेचा लाभ घेतलेला नसल्याचे शपथपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.
इच्छुक बचत गटांनी निश्चित मुदतीत अर्ज सादर करून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन समाज कल्याणच्या सहायक आयुक्त गिता गुठ्ठे यांनी केले आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment