08 October, 2025

जिल्ह्यातील 106 पाणथळ क्षेत्राचे होणार सर्वेक्षण • सर्वेक्षकांना सर्व संबंधित यंत्रणांनी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी

* पाणथळ क्षेत्राचे नकाशे तसेच ब्रीफ डॉक्यूमेंट तयार करणार हिंगोली, दि. 08 (जिमाका) : राज्यातील पाणथळ क्षेत्र अधिसूचित करण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील पाणथळ क्षेत्राचे नकाशे तसेच ब्रीफ डॉक्यूमेंट तयार करण्यासाठी नॅशनल सेंटर फॉर सस्टनेबल कोस्टल मॅनेजमेंट यांच्याद्वारे जिल्ह्यातील 106 पाणथळ क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी सर्व संबंधित यंत्रणानी सर्वेक्षणासाठी येणाऱ्यांना आवश्यक माहिती उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज आयोजित बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील पाणथळ क्षेत्र अधिसूचित करण्याच्या अनुषंगाने नकाशे तसेच ब्रीफ डॉक्यूमेंट तयार करण्यासाठी सर्वेक्षणाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. जी. पोत्रे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख प्रशांत बिलोलीकर तसेच इतर संबंधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते. तर सर्व तहसीलदार व नगर परिषदाचे मुख्याधिकारी ऑनलाईन उपस्थित होते. जिल्ह्यातील पाणथळ क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यासाठी नॅशनल सेंटर फॉर सस्टनेबल कोस्टल मॅनेजमेंटची टीम जिल्ह्यात दाखल झाली आहे. या पथकाद्वारे प्रत्येक तालुक्यात दोन सर्वेक्षकामार्फत उद्यापासून सर्वेक्षण करणार आहेत. यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक सहकार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी दिले आहेत. ***

No comments: