06 October, 2025

भारतीय टपाल विभागाची खास सुविधा परदेशात पार्सल पाठवा सुलभ दरात

• आपल्या प्रियजनांसाठी फराळ, भेटवस्तू, दस्तऐवज किंवा महत्त्वाचे सामान आता घरबसल्या पाठवा हिंगोली(जिमाका), दि. 06 : भारतीय टपाल विभागाने नागरिकांसाठी विश्वसनीय, सुरक्षित आणि किफायतशीर परदेशी पार्सल सेवा सुरु केली आहे. यामुळे आपल्या प्रियजनांसाठी फराळ, भेटवस्तू, दस्तऐवज किंवा महत्वाचे सामान आता घरबसल्या पाठवता येणार आहेत. सर्व वर्गातील नागरिकांना परवडणारी सुलभ दरात सेवा, पार्सल पूर्ण सुरक्षित पद्धतीने पाठविण्याची व्यवस्था, नियोजित वेळेत गंतव्यस्थळी पोहोचवली जाते. जवळच्या टपाल कार्यालयातून सहज सेवा, पार्सलची स्थिती ऑनलाईन तपासण्यासाठी ट्रॅकिंगची सुविधा देण्यात आली आहे. सेवा घेण्याची पद्धत : जवळच्या टपाल कार्यालयात पार्सल द्या, वजन आणि गंतव्य स्थानानुसार दर निश्चित केले जातात. ग्राहकाला पोस्ट ऑफिस रशीद, ट्रॅकींग आयडी दिली जाते. पार्सल सुरक्षितपणे परदेशी गंतव्यस्थळी पोहोचवले जाते. या सुविधेमुळे सणासुदीच्या काळात भेटवस्तू पाठविणे, व्यावसायिक व औपचारिक दस्तऐवज पाठविण्यास विश्वासार्ह सुविधा, ट्रॅकिंगमुळे पार्सल स्थितीवर नेहमी लक्ष ठेवता येते. ग्राहकांनी जवळच्या मुख्य टपाल कार्यालय, उपटपाल कार्यालयाशी संपर्क साधावा. ऑनलाईन माहिती आणि सेवांसाठी www.indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि अधिक माहितीसाठी प्रकाश रुद्रवार (9420194838) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन परभणी विभागाचे अधीक्षक डाकघर यांनी केले आहे. *****

No comments: