03 October, 2025
शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
हिंगोली, दि. 3 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) अर्ज करण्यास 9 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पूरस्थिती निर्माण झाल्याने उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास अडचणी आल्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. उमेदवार नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे परीक्षा शुल्क भरुन 9 ऑक्टोबर रोजी रात्री 11.59 मिनिटांपर्यंत अर्ज करु शकतात. यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले असल्याचे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्रा.) प्रशांत दिग्रसकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment