03 October, 2025

अभिजात मराठी भाषा सप्ताहाचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते प्रारंभ

हिंगोली (जिमाका), दि. 03 : जिल्ह्यात अभिजात मराठी भाषा सप्ताह दि. 3 ते 9 ऑक्टोबर, 2025 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचा प्रारंभ जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते आज करण्यात आले. अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त अभिजात मराठी भाषेबद्दल जागृती व्हावी व अभिजात मराठीविषयक ग्रंथाची व्हावी यासाठी दि. 3 ते 9 ऑक्टोबर, 2025 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयात अभ्यासकांना पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. याचा अभ्यासकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. यावेळी अव्वल कारकून कुसुम भिसे, महसूल सहाय्यक वहिदा काजी, वाहनचालक सुनील मरळे आदी उपस्थित होते. ******

No comments: