09 October, 2025

प्रधानमंत्री यांच्या हस्ते शनिवारी कृषीच्या नवीन योजनांचा शुभारंभ

• कृषी विज्ञान केंद्रात शेतकरी मेळाव्याचे आयोजन हिंगोली (जिमाका), दि. 09 : प्रधानमंत्री दि. 11 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता कृषीच्या नवीन योजनांचा शुभारंभ करणार आहेत. त्यानिमित्ताने कृषी विज्ञान केंद्र परिसरात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला सुमारे 500 शेतकऱ्यांची उपस्थिती अपेक्षित असून यावेळी "हळद पिकाचे सद्यस्थितीतील व्यवस्थापन" आणि "हरभरा पिकाचे भविष्यातील व्यवस्थापन तंत्रज्ञान" या विषयावर मार्गदर्शन सुद्धा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला हिंगोली जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी , सरपंच. आमदार, खासदार, जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, माजी सदस्य, पंचायत समितीचे सर्व सदस्य, माजी सदस्य या सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या गावातील शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राच्या या मेळाव्यात समाविष्ट होण्यासाठी प्रेरित करावेत आणि स्वतः सुद्धा आवर्जून उपस्थित रहावेत, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आले आहे. ****

No comments: