09 October, 2025

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

• जिल्हा वार्षिक योजनेच्या निधी मागणीचे प्रस्ताव तात्काळ सादर करा-जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हिंगोली (जिमाका), दि. 09 : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 अंतर्गत निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे, प्रदीप नळगीरकर, समाज कल्याणच्या सहायक आयुक्त गिता गुठ्ठे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी सुनिल बारसे यांच्यासह सर्व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 अंतर्गत विविध विकास योजनांचे निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव तात्काळ सादर करावेत. क्रीडांगण विकास कामासाठी आदर्श शाळाचा समावेश करावा. जिल्ह्यात आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच संगणक प्रयोगशाळा निर्माण करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. यासाठी अतिरिक्त लागणारा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले. यावेळी मृद व जलसंधारण, दुग्धशाळा विकास, महावितरण, पोलीस, जिल्हा परिषद, पशुसंवर्धन विभाग, मत्स्यव्यवसाय, क्रीडा विभाग, कौशल्य विकास योजना, पाणीपुरवठा व स्वच्छता, कृषि विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण, महिला व बालविकास विभाग, वन विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरविकास, पाटबंधारे, शिक्षण, परिवहन विभाग यासह विविध विभागांच्या प्रस्तावाबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत प्रशासनाच्या विविध विभागांना त्यांच्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करुन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. तसेच जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनाचाही यावेळी आढावा घेण्यात आला. महाराष्ट्र ॲसेट रजिस्टर सिस्टीम पोर्टलवर प्रत्येक कामाची युनिक आयडी तयार करण्यासाठी दिले प्रशिक्षण प्रशासकीय मान्यतेपूर्वी युनिक आयडी क्रमांक घेणे बंधनकारक-जिल्हाधिकारी राज्यातील प्रत्येक पायाभूत विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र संपत्ती पंजीकरण पध्दती (महासंपत्ती) (महाराष्ट्र ॲसेट रजिस्टर सिस्टीम) या पोर्टलवरुन युनिक आयडी क्रमांक घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी आज जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये पोर्टलवर माहिती कशी अपलोड करावी याबाबत याबाबत लाईव्ह प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. युनिक आयडी क्रमांक घेण्यासाठी प्रत्येक विभागानी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रत्येक पायाभूत सुविधेच्या कामाची प्रशासकीय मान्यता घेण्यापूर्वी युनिक आयडी क्रमांक घेणे बंधनकारक आहे. यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी पोर्टल जिओ टॅगींग करण्यासाठी विभागाने नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांसाठी लॉगीन क्रिडेन्शियल क्रिएट करणे आवश्यक आहे. यासाठी कार्यालय प्रमुखाची सेवार्थ आयडी, नाव, संपर्क क्रमांक, ई-मेल आयडी, विभाग आदी माहिती आजच उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी दिले. सर्व विभागप्रमुखांना पुढील आठवड्यात लॉगीन आयडी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. लॉगीन आयडी प्राप्त झाल्यानंतर सर्व संबंधित विभागानी महाराष्ट्र ॲसेट रजिस्टर सिस्टीम पोर्टलवर चालू वर्षाच्या प्रत्येक पायाभूत सुविधेच्या कामाची माहिती भरुन युनिक आयडी प्राप्त केल्यानंतरच प्रशासकीय मान्यता व निधी वितरीत करण्यात येणार आहे. त्यामुळे हे काम तातडीने करावे. तसेच मागील पाच वर्षाच्या कामाची माहितीही पोर्टलवर अपलोड करावयाची असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी सांगितले. ***

No comments: