08 October, 2025
'स्मार्ट' प्रकल्पांतर्गंत समुदाय आधारित संस्थांच्या संचालकांसाठी कायदेविषयक अनुपालन जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन
हिंगोली, दि. ०८ (जिमाका) :
जागतिक बँक अर्थसहाय्यित मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत टीएसए संस्थेमार्फत आज बुधवारी रोजी समुदाय आधारित संस्थांच्या संचालकांसाठी जिल्हास्तरीय एक दिवसीय कायदेशीर अनुपालन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेत शैलेश बिरगाळे, चार्टर्ड अकाउंटंट यांनी कंपनी अनुपालन कायदा या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच संचालकांच्या विविध शंकांचे निरसन केले. अन्नसुरक्षा आणि गुणवत्ता असोसिएट, लातूर सचिन कच्छवे यांनी समुदाय आधारित संस्थांच्या संचालकांना अन्न सुरक्षा या विषयावर प्रात्यक्षिक मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास जी. बी. बंटेवाड, नोडल अधिकारी, जिल्हा अंमलबजावणी कक्षाचे जी. एच. कच्छवे, पुरवठा व मूल्यसाखळी तज्ञ जितेश नालट, अर्थतज्ञ व वित्तीय सल्लागार तसेच कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि संस्थांचे संचालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जी. बी. बंटेवाड यांनी केले. आभार प्रदर्शन बालाजी मोडे यांनी केले तर सूत्रसंचालन वैभव तांबडे यांनी केले.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment