03 October, 2025
हिंगोली येथे आज अनुकंपा उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे होणार वितरण
• एमपीएससी'मार्फत निवड झालेल्या उमेदवारांनाही मिळणार नियुक्ती
हिंगोली(जिमाका), 03 : जिल्ह्यातील पात्र अनुकंपाधारक उमेदवार आणि महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान करण्यासाठी उद्या दि. 4 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात हिंगोली जिल्ह्यातील पात्र 105 उमेदवारांना नियुक्तीपत्रे वितरित केली जाणार आहेत.
शासकीय नोकरीत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी अथवा अपत्याला नोकरी दिली जाते. यासाठी तयार करण्यात आलेल्या नवीन अनुकंपा धोरणानुसार राज्यात एकाचवेळी नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. यानिमित्ताने 4 ऑक्टोबरला मुंबई येथे मुख्य कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहतील.
याच दिवशी हिंगोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात हिंगोली जिल्ह्यातील 70 अनुकंपा उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जाणार असून, यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होईल. तसेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या जिल्ह्यातील 35 उमेदवारांना लिपिक-टंकलेखक पदाची नियुक्तीपत्रे याच कार्यक्रमात दिली जाणार आहेत. त्यामुळे अनुकंपाधारक क 27 आणि ड संवर्गातील 43 निवड झालेले उमेदवार, तसेच 'एमपीएससी'कडून शिफारस प्राप्त झालेल्या 35 लिपिक टंकलेखक प्रवर्गातील उमेदवारांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment