14 October, 2025

जिल्हा परिषद निवडणूक व पंचायत समिती गणाच्या आरक्षण सोडतीबाबत 17 ऑक्टोबरपर्यंत हरकती सादर करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 14 : हिंगोली जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्या जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणातील एकूण सदस्य संख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण स्त्रियांसह) राखून ठेवण्यात आलेले निवडणूक विभाग व निर्वाचक गणाबाबत जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या आदेशानुसार प्रारुप आरक्षणाच्या अधिसूचनेची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयातील फलकावर, जिल्हा परिषद कार्यालयातील फलकावर तसेच हिंगोली जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालये व पंचायत समिती कार्यालयाच्या फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या आदेशाच्या मसुद्यास कुणाची हरकत किंवा सूचना असल्यास सकारण लेखी निवेदने, हरकती, सूचना जिल्हाधिकारी यांच्याकडे दि. 17 ऑक्टोबर, 2025 पर्यंत सादर करावेत. या तारखेनंतर आलेली निवेदने, हरकती, सूचना इत्यादी विचारात घेतले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कळविले आहे. *****

No comments: