06 October, 2025

शासनमान्य ग्रंथांची यादीत समावेशासाठी प्रकाशित ग्रंथ पाठविण्याचे आवाहन

हिंगोली(जिमाका), दि. 06 : राज्यातील शासकीय व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना राज्यात मराठी भाषेत प्रकाशित झालेल्या ग्रंथांची माहिती वा खरेदीकरिता मार्गदर्शक ठरावी म्हणून ग्रंथालय संचालनालयाकडून ग्रंथ निवड समितीच्या सदस्यांनी शिफारस केलेली वर्षनिहाय "शासनमान्य ग्रंथांची यादी" प्रकाशित करण्यात येते. या "शासनमान्य ग्रंथांची यादी" करिता सन 2024 या कॅलेंडर वर्षात दि. 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत प्रकाशित झालेल्या मराठी भाषेतील ग्रंथांची निवड करण्यासाठी आणि शासनमान्य ग्रंथांच्या यादीत समावेश होण्याच्या दृष्टीने सन 2024 या कॅलेंडर वर्षामध्ये प्रकाशित झालेल्या व प्रथम आवृत्ती असलेल्या ग्रंथांची प्रत्येकी एक प्रत विनामूल्य ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, नगर भवन, टाऊन हॉल, मुंबई- 400 001 यांच्याकडे दिनांक 15 ऑक्टोबर, 2025 पर्यंत पाठविण्यात यावीत. सन 2024 या वर्षात प्रकाशित झालेले ग्रंथ जर यापूर्वी संचालनालयास पाठविले असल्यास पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नाही. हे निवेदन महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in व ग्रंथालय संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. ******

No comments: