03 October, 2025

मागासवर्गीय विद्यार्थी लॅपटॉप लाभार्थ्यांची बुधवारी ईश्वर चिठ्ठीद्वारे होणार निवड

हिंगोली (जिमाका), दि. 03 : जिल्हा परिषद हिंगोली यांच्यामार्फत सेस योजना सन 2025-26 अंतर्गत 20 टक्के मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लॅपटॉप खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यासाठी लाभार्थ्यांची निवड करावयाची आहे. लाभार्थी निवडीसाठी पंचायत समितीस्तरावरुन लाभार्थीचे अर्ज मागविण्यात आले होते. पात्र लाभार्थ्यामधून ईश्वर चिठ्ठीद्वारे लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी दि. 25 सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती. परंतु प्रशासकीय कारणास्तव नियोजित निवड प्रक्रिया रद्द करुन पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे आता लॅपटॉप योजनेची निवड प्रक्रिया आता बुधवार, दि. 8 ऑक्टोबर, 2025 रोजी दुपारी 3 वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत ईश्वर चिठ्ठीद्वारे करण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी अथवा त्यांच्या पालकांनी निवडीच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहावेत, असे आवाहन निवड समितीचे अध्यक्ष तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, सह अध्यक्ष तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, सदस्य सचिव तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी गिता गुट्टे यांनी केले आहे. *****

No comments: