31 October, 2025
जिल्हाधिकारी कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांना अभिवादन
हिंगोली (जिमाका), दि. 31 : सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि इंदिरा गांधी यांची पुण्यतिथीनिमित्त आज त्यांच्या प्रतिमेस अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच यावेळी राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना एकात्मतेची शपथ देण्यात आली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, नायब तहसीलदार संतोष बोथीकर, सी. आर. गोळेगावकर यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment