03 October, 2025
अन्नपूर्णा वृद्धाश्रमात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा
हिंगोली (जिमाका),दि.03: सामाजिक न्याय विभागामार्फत येथील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामार्फत सेनगाव तालुक्यातील जवळा बु. येथील अन्नपूर्णा ज्येष्ठ नागरिक वृद्धाश्रमात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना केळी, सफरचंद वाटप करून त्यांच्या तब्येतीची विचारणा केली.
या कार्यक्रमास समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त गिता गुठ्ठे, विशेष अधिकारी अमोल घुगे, निरीक्षक एच. बी.पोपळघट व अन्नपुर्णा ज्येष्ठ नागरिक वृद्धाश्रमाच्या श्रीमती शांताबाई दिपके, श्री. झिंझाडे, डॉ. विलास वाकळे, नागेंद्र वाकळे, श्रीमती वैशाली वाकळे आदी उपस्थित होते.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment