27 October, 2025
शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांची रिक्त पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करा
हिंगोली(जिमाका), दि. 27 : कळमनुरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या हिंगोली व परभणी जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळेमधील शिक्षकांची रिक्त पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्यासाठी बाह्यस्त्रोत संस्था मे छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था व मे. महाराष्ट्र विकास ग्रुप यांना आदेश देण्यात आलेले आहेत.
कळमनुरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत 5 आश्रमशाळा येत असून त्यापैकी 01 आश्रमशाळा ही उच्च माध्यमिक आहे. या शाळेमध्ये उच्च माध्यमिक शिक्षक हे रिक्त पद बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येणार आहे. यासाठी एमएससी (रसायनशास्त्र) बीएड टीएआयटी स्कोअर असणे आवश्यक आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी अपर आयुक्त नाशिक व ठाणे विभागाच्या https://scsmltd.com व अपर आयुक्त अमरावती व नागपूर विभागाच्या https://mvgcompany.in या संकेतस्थळावर दिलेल्या लिंकवर दि. 31 ऑक्टोबर, 2025 पर्यंत अर्ज भरण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन कळमनुरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी केले आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment