08 October, 2025

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र फाळेगावला दिली भेट

• आरोग्य सेवांचा घेतला आढावा हिंगोली, दि. 08 (जिमाका) : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज फाळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन केंद्रातील विविध आरोग्य सेवांची पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी प्रसूती गृह, औषधी भांडार, ऑपरेशन थिएटर, प्रयोगशाळा आदी विभागांना भेट देत उपलब्ध सुविधा आणि स्वच्छतेची तपासणी केली. एन सी डी पोर्टल वरील उच्च रक्तदाब मधुमेहा व कॅन्सर स्क्रीनिंगचे कामकाज सुधारण्यासाठी सक्त सूचना देण्यात आल्या. जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एकूणच कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. या एन कॉस मूल्यांकनामध्ये आढळलेल्या त्रुटी तातडीने दूर करून आरोग्य सेवांचा दर्जा आणखी उंचावण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्यांनी रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानके म्हणजे सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये दिली जाणारी आरोग्य सेवा उच्च दर्जाची, सुरक्षित आणि रूग्णकेंद्रित आहे हे सुनिश्चित करण्यासाठी सरकारने तयार केलेले नियम आणि निकष होत. या मानकांचा उद्देश सार्वजनिक आरोग्य सेवांची गुणवत्ता सुधारणे, रुग्णांना चांगली सेवा मिळेल याची खात्री करणे आणि जगभरातील सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करणे हा आहे. या भेटीच्या वेळी एन क्वॉस असेसमेंट टीममधील अधिकारी डॉ. राजेश्वर कत्रूवार, डॉ. प्रकाश जाधव, डॉ. प्रशांत पुठावार तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपाली पतंगे, डॉ. गायकवाड आणि सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांच्या या भेटीमुळे फाळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारीवर्गामध्ये कामाबाबत सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. एन-क्वॉस मूल्यांकनासाठी आवश्यक सुधारणा वेळेत पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. *****

No comments: