10 October, 2025

जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर

हिंगोली (जिमाका), दि. 10 : जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांतील सभापती पदांसाठी आरक्षणाची सोडत आज नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे पार पडली. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पद्धतीने प्रक्रिया पार पडली. या सोडतीत पंचायत समितीनिहाय सभापती पदांचे आरक्षण पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे. वसमत-अनुसूचित जाती, औंढा नागनाथ - अनुसूचित जमाती (महिला), सेनगाव - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), कळमनुरी - सर्वसाधारण आणि हिंगोली - सर्वसाधारण (महिला) या सोडतीच्या प्रक्रियेस संबंधित अधिकारी तसेच विविध पंचायत समित्यांचे प्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते. ******

No comments: