13 October, 2025

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला विविध विभागाचा आढावा

• जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला पाणी आरक्षणाबाबतचा आढावा हिंगोली (जिमाका), दि. 13 : जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली पाणी आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत टंचाई कालावधीसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणी आरक्षणाबाबत तसेच आकस्मित पाण्याचे आरक्षणाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच नागरिकांना पिण्याचे पाणी व पशुंना पिण्याचे पाणी आरक्षणाबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता ए. बी. जगताप, पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता आर. पी. गरुड, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अण्णाराव कांबळे आदी उपस्थित होते. स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली लॉजिस्टीक समन्वय समितीची स्थापना राज्याचे लॉजिस्टिक धोरण-2024 बाबत जागरुकता निर्माण करणे तसेच तंत्रज्ञान आधारित लॉजिस्टीकसाठी स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा लॉजिस्टिक समन्वय समितीची स्थापना करण्यात आली. तसेच प्रधानमंत्री यांच्या विकसित भारत 2047 या देशाच्या शाश्वत विकासाच्या ध्येयपूर्तीच्या उद्दिष्टासाठी राज्याचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्र राज्याची औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणूक एक ट्रिलीयन डॉलर करण्याचे ठरविले आहेत. त्याअनुषंगाने अभ्यासगट तयार करण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून बँक आणि प्रायवेट इंडस्ट्रीयल टाऊनशीप प्रोमोशन ही समितीही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज गठीत करण्यात आली. यावेळी नगर रचना विभागाचे सहायक संचालक, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी, भूमी अभिलेखचे अधीक्षक, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, महावितरणचे अधीक्षक अभियंता, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक, उद्योग निरीक्षक, उद्योग संघटनेचे ज्ञानेश्वर मामडे आदी उपस्थित होते. वीज उपकेंद्र व सौर कृषी वाहिनीसाठी जागा उपलब्ध करुन देण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी घेतला आढावा कळमनुरी तालुक्यातील तुप्पा, सोडेगांव, कडपदेव येथील 33 केव्ही उपकेंद्रासाठी तसेच वाकोडी येथील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी जागा तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील तामटीतांडा येथील 33 केव्ही उपकेंद्र व जलालदाभा येथील 400/200 केव्ही उपकेंद्रासाठी आणि सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील 400/200 केव्ही उपकेंद्राच्या जागा उपलब्ध करुन देण्याबाबतच्या सद्यस्थितीचा आढावा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज घेतला. यावेळी महावितरण व महापारेषणचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ***

No comments: