06 October, 2025

प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेतील कामाचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली (जिमाका), दि. 6 : जिल्ह्यातील प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेत निवड केलेल्या गावांनी विविध कामाचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त गीता गुठ्ठे, सर्व संबंधित विभागाचे अधिकारी, आदर्श ग्राम योजनेतील गावाचे ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच उपस्थित होते. प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेत सन 2022-23 मध्ये निवड झालेल्या हिंगोली तालुक्यातील कलगांव, लिंबाळा, वसमत तालुक्यातील पांगरा सती, गुंज, कळमनुरी तालुक्यातील देवजना, पुयना आणि सेनगाव तालुक्यातील केंद्रा बु. व ताकतोडा या गावच्या सरपंच व ग्रापंचायत अधिकारी यांनी आदर्श ग्राम योजनेंतर्गत गावातील विविध कामाचे प्रस्ताव दोन दिवसात सादर करावेत. तसेच सन 2025-26 मध्ये निवड झालेल्या कळमनुरी तालुक्यातील उमरा, हिंगोली तालुक्यातील सरकळी, वऱ्हाडी, सेनगाव तालुक्यातील धोतरा, औंढा नागनाथ तालुक्यातील बेरुळा आणि वसमत तालुक्यातील गणेशपूर, मोहगांव, सुनेगाव, राजापूर येथील प्रस्ताव गावातील कुटुंबाचे सर्वेक्षण करुन तसेच ग्रामसभा घेऊन विविध विकास कामाचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी तात्काळ सादर करावेत. या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई प्रस्तावित करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी दिल्या. *****

No comments: