12 October, 2025

हिंगोली तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचे आज आयोजन

हिंगोली (जिमाका), दि. 12 : महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961 मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम नियम 2025 नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्यासाठी सोडत पद्धतीने कार्यवाही करण्यासाठी सोमवार दि. 13 ऑक्टोबर, 2025 रोजी विशेष सभा आयोजित केली आहे. जिल्हा परिषद गटाच्या सदस्यांची आरक्षण सोडत सोमवार, दि. 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात काढण्यात येणार आहे. तर पंचायत समिती निर्वाचक गणांसाठी सोडत सोमवार, दि. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय सभागृह, हिंगोली येथे होणार आहे. जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची सभेस हजर राहण्याची इच्छा आहे त्यांनी संबंधित ठिकाणी वेळेवेर हजर राहावे, असे आवाहन तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी केले आहे. *****

No comments: