01 October, 2025

'मुख्यमंत्री अल्प मुदतीचे कौशल्य प्रशिक्षण' नोंदणीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 01 : जिल्ह्यातील युवक-युवतींना उद्योग क्षेत्राला आवश्यक कुशल मनुष्यबळाचा पुरवठा आणि युवा वर्गाला रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, या उद्देशाने राज्यात मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम राबविले जाणार आहेत. दरवर्षी 75 हजार जणांना प्रशिक्षित करण्याची ही योजना असून 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या उपक्रमाचे ऑनलाइन उद्घाटन केले जाणार आहे. मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यात सेल्फ एम्प्लॉईड टेलर, सोलर पॅनल इंस्टॉलेशन टेक्निशियन, अससिस्टन्ट ब्युटी थेरपिस्ट, अससिस्टन्ट कार्पेन्टर वूडन फर्निचर, इलेक्ट्रिशियन डोमेस्टिक सोल्यूशन, फिटर - फॅब्रिकेशन, फिटर -मेकॅनिकल, असेंब्ली सहाय्यक इलेक्ट्रिशियन, किसान ड्रोन ऑपरेटर, टु व्हीलर सर्व्हिस असिस्टंट, सीएनसी ऑपरेटर, फील्ड टेक्निशियन, डिजिटल मित्र, आर्टिफिशियल इंटेलिजेंस असिस्टंट, ब्राइडल, फॅशन आणि पोर्टफोलिओ, मेकअप आर्टिस्ट, मोबाइल फोन हार्डवेअर रिपेअर टेक्निशियन, इलेक्ट्रिशियन डोमेस्टिक सोल्यूशन इत्यादी अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमांमध्ये कौशल्य प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी https://msbsvet.edu.in/Public/ITIShortTermTraining.aspx या लिंकच्या माध्यमातून आपली इच्छुकता नोंदविणे आवश्यक आहे, त्या नोंदणीसाठी तालुक्यातील शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी केले आहे. **

No comments: