22 August, 2025

वसमत आयटीआयमध्ये निदेशक नियुक्तीसाठी 26 रोजी मुलाखत

हिंगोली (जिमाका), दि. 22 : वसमत येथील स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय) संस्थेमध्ये आयटीआय सोलार टेक्नीशियन इलेक्ट्रीकल या ट्रेडसाठी तासिका तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात 11 महिन्यासाठी निदेशक नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी दि. 26 ऑगस्ट रोजी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. या पदासाठी इलेक्ट्रीकल इंजिनियरींग पदवीधारक व पदविकाधारक पात्र उमेदवारांनी बायोडाटा व अर्ज दि. 26 ऑगस्टपर्यंत कार्यालयीन वेळेत संस्थेमध्ये सादर करावे व दि. 26 ऑगस्ट रोजी पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस. एल. कोंडावार यांनी केले आहे. ******

No comments: